शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान करणाऱ्या जंगली हत्तीचा विजेचा शॉक लागून मृत्यू
सिंदेवाही:-
सिंदेवाही परिसरात मागील अनेक दिवसांपासून सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील जंगल व लागून असलेल्या शेतशिवारांत भटकणाऱ्या व शेतीचे नुकसान करणाऱ्या 'त्या' हत्तीचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील चिटकी शेतशिवारात आज सकाळी उघडकीस आली आहे.
शेतामध्ये जंगली श्वापदांकडून होणाऱ्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी परीसरातील शेतकरी शेतकुंपनांना विद्युत करंट लावतात. अशाच एका खाजगी शेतानजीक गेल्याने आणि विद्युत करंटाचा स्पर्श झाल्याने उपक्षेत्र तांबेगडी मेंढा अंतर्गत येणाऱ्या मुरपार बीटामधील चिटकी गावातील शेतशिवारात आज सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास सदर हत्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले •असून पुढील तपास सुरू आहे.

