हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात महीला ठार
हल्लेखोर नेमका वाघ की बिबट संशय कायम
कूरखेडा -:-
तालूक्यातील ढूसी येथील शेतकरी महीलेवर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने सायत्राबाई अंताराम बोगा वय ५५ ही वृद्ध महिला ठार झाल्याची घटणा आज सकाळी गावालगत असलेल्या जगंलात घडली महिलेवर हल्ला करणारा प्राणी वाघ की बिबट हा संभ्रम मात्र कायम आहे गावकऱ्यार्नी वाघानेच हल्ला केला असा संशय व्यक्त केला आहे
देलनवाडी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिचेवाडा बिट मधील ढूसीचा जगंल व डोगंरालगत मृतक महिला शेतकरीचे शेत आहे आज सकाळी ती शेतातील कामे आटोपत शेताला लागून असलेल्या डोगंर व जगंल परीसरात सरपण गोळा करण्याकरीता गेली होती मात्र बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिचा पती गावात परत येत गावातील काही इसमाना घेऊन जगंलात गेला येथे तिचा शोध घेण्यात आला यावेळी ती जगंलात मृत अवस्थेत आढळून आली तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या तिच्यावर वाघ किंवा बिबट या हिंस्र प्राण्याने हल्ला केला असावा असा अंदाज आहे घटनेची माहीती मीळताच वडसा चे साहायक वनसंरक्षक भारती देलनवाडी चे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर क्षेत्र साहायक मानीक राऊत वनरक्षक अतूल गांगरेड्डीवार वनरक्षक शारदा कोरेत व वनकर्मचार्यानी घटणास्थळावर पोहचत पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणी करीता कूरखेडा उपजिल्हा रूग्णालयात आणले मृतकाचा पश्चात पती,दोन मूले,मूलगी,सूना नातवंड व बराच
मोठा आप्तपरीवार आहे
याबाबद देलनवाडी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर यांचाकडून भ्रमनध्वनीवर माहिती जाणून घेतली तेव्हा त्यानी सांगीतले की या परीसरात सद्या वाघाचे लोकेशन नसल्याने मृतक महिला ही बिबटच्या हल्ल्यात ठार झाली असावी असा प्राथमीक अंदाज आहे घटणास्थळावर हल्लेखोर प्राण्याचे पायाचे ठसे तज्ञ चमू कडून घेण्याची कार्यवाही सूरू आहे या चमूचा अहवाला नंतरच हल्ला करणारा वाघ की बिबट हे स्पष्ट होणार आहे

