कालेश्वरम मेडीगड्डा प्रकल्पाच्या तीन
पिलरला गेले तडे, मोठी हाणी होण्याची शक्यता
गडचिरोली:-
महाराष्ट्र राज्य व तेलंगाणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील वीस हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कालेश्वरम मेडीगड्डा प्रकल्पाच्या तीन पिलरला तडे गेल्याची मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकल्पाच्या 20,21,22. नंबरच्या पीलरला तडे गेले असुन यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संपूर्ण तेलंगणा राज्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या या प्रकल्पासाठी वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च आला असून हा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मात्र या प्रकल्पाचे काम करताना पर्यावरणविषयक कायद्याचे उल्लघन केले गेले यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली होती मात्र याकडे साफ दुर्लक्ष केल्या गेले. तसेच ज्या सिरोंचा तालुक्यात याचे बांधकाम झाले ते सिरोंच्या क्षेत्रात भूकंपाचे झटके जाणवले होते. याकडे दुर्लक्ष करून हे काम केल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे म्हटल्या जात आहे. या ब्रिज वरून सध्या सर्व वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती आहे. या पिलरला तडे जाणे ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे महाराष्ट्र तेलंगणातील अनेक तालुके पाण्याखाली येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.. या प्रकरणाविषयी मेडीगड्डा प्रोजेक्ट इन्चार्ज तिरुपती राव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केल्या असत्या त्यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.

