BIG BREAKING हायवाने दिली दुचाकीला धडक, दोन तरूण जागीच ठार तर एक गंभीर

0
BIG BREAKING 
हायवाने दिली दुचाकीला धडक, दोन तरूण जागीच ठार तर एक गंभीर




आरमोरी:-
गडचिरोली वरून आरमोरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवा चालकाने एका दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दोन युवक जागीच ठार तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आरमोरी गडचिरोली मार्गावरील आरमोरी तालुक्यातील किटाळी गावानजीक
दिनांक 21 ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. मृतक युवकाचे नाव मनीष नेताजी मेश्राम वय वर्षे १९ रा. विकास नगर ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर, सुरज विलास मशाखेत्री वय वर्षे 23 रा. इंदिरानगर चंद्रपूर असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव तुषार दशरथ मडावी वय वर्षे 23 राहणार संजय नगर चंद्रपूर असे आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक सुरज मशाखेत्री, मनीष मेश्राम व तुषार मडावी हे तिघे मित्र आरमोरी येथे दुर्गा उत्सव बघण्यासाठी आले होते. हे तिघेही मित्र दुर्गा उत्सव बघून एम. एच. 34 बी. डब्ल्यू. 3702  पल्सर या क्रमांकाच्या मोटरसायकलने हे तिघेही आरमोरी वरून गडचिरोली मार्गे जात होते. दरम्यान किटाळी- चुरमुरा गावाजवळ गड़चिरोली वरून आरमोरी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. एच 33 डब्ल्यू 0555 या क्रमांकाच्या हायवाच्या चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मनीष मेश्राम, सुरज म्हशाखेत्री हे टिप्पर खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तुषार मडावी हा दुचाकीवरून उसळून पडल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व हायवा चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक याचे मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक विजय चलाख करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !