आष्टी पोलीसांनी पकडली लाखो रुपयांची अवैध दारू

0
आष्टी पोलीसांनी पकडली लाखो रुपयांची अवैध दारू


दारुसह पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

आष्टी:-
   छत्तीसगड व तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणारी अवैध दारू वाहतुक याची माहिती काढून कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक  निलोत्पल यांनी आदेशीत केले असून त्या अनुषंगाने आज गोपनीय माहिती द्वारे माहिती प्राप्त झाली की एका चार चाकी वहाणा मधून विधानसभा निवडणुक होत असलेल्या छत्तीसगड राज्यात आष्टी मार्गे  दारू वाहतुक होणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना प्राप्त झाली त्या अनुषंगाने आष्टी फॉरेस्ट नाका येथे अधिकारी व अंमलदार यांचे सह  नाकाबंदी केली असता 16.00 (चार वाजता च्या दरम्यान) एक संशयित वाहण MH - 34 BR /6570 व्हॅन व त्याचा चालक सुनीलसिंह बैस रा चंद्रपूर हे मिळून आले. सदर  वाहनास पंचासमक्ष चेक केले असता त्यामध्ये अवैध देशी - विदेशी दारू किंमत 1,25,600/- रूपये व वाहनाची किंमत 4 लाख रुपये असा एकूण 5,25,600/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.  आरोपी सुनीलसींह बैस याचे वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही पोलिस निरीक्षक  कुंदन गावडे, पोलीस उपनिरीक्षक  सोमनाथ पवार, अतुल तराळे, पो. हवा. करमे, पो. शि. संतोष नागुलवार, तोडासे, रायसिडाम,  यांनी पार पाडली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !