आष्टी येथे आजपासून शारदीय दुर्गा उत्सव
आष्टी:-
आष्टी येथील शारदीय बंगाली सेवा समितीच्या पुढाकाराने २० ऑक्टोबर पासून सार्वजनिक शारदीय दुर्गा उत्सव आष्टी येथील सार्वजनिक दुर्गा तथा कालीमाता मंदिर, कालिबाडी येथे संपन्न होत आहे. सदर उत्सव २४ ऑक्टोबर विजयादशमीपर्यंत चालणार आहे.
या दरम्यान धार्मिक परंपरेनुसार विधिवत पूजन, पुष्पांजली, संध्या आरती, महाअष्टमी, नवमीच्या दिवशी हवन (यज्ञ) आदी कार्यक्रम भक्तिभावाने पार पडणार आहेत.
२० ते २४ ऑक्टोबरपर्यंत रात्री ८ ते ११:३० च्या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २१ ऑक्टोबरला राजुरा येथील सप्तसूर म्युझिकल ग्रुपतर्फे जागरण तथा भक्ती. संध्या, २२ ऑक्टोबर रोजी गरबा तथा दांडिया नृत्य स्पर्धा, तर विजयादशमीच्या दिवशी "नशीब " हे नाटक सादर होणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात- आले आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याने उत्सवादरम्यान गर्दी उसळणार आहे.

