विद्यार्थ्यांनी राष्ट्र व समाज कल्याणासाठी स्वतःच आत्मपरीक्षण करावे - पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप

0
 विद्यार्थ्यांनी राष्ट्र व समाज कल्याणासाठी स्वतःच आत्मपरीक्षण करावे - पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप 



अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

 
आष्टी:-
  प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करुन राष्ट्र आणि समाज कल्याणासाठी कार्य करावे निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला वेगळं बनवले असून प्रत्येकाने दुसऱ्याची कापी न करता स्वतः आत्मपरीक्षण करुन वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्न करून आपली छाप उमटवावी असे आव्हान पोलीस उप निरीक्षक भाग्यश्री जगताप पोलीस स्टेशन आष्टी यांनी विद्यार्थ्यांना केले.महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाच्या मानव विज्ञान अभ्यास मंडळाद्वारे समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त भाग्यश्री जगताप यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून राष्ट्रप्रेम, मातृभूमी या सर्वांच्या अनुषंगाने परिश्रम घेऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे आणि त्याकरिता जे कष्ट करण्याची तयारी असेल ते कष्ट करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे आणि समाजाच्या, देशाच्या,विश्वाच्या कल्याणाकरिता आपलं जीवन समर्पित करावे असे मार्गदर्शन केले. त्यासोबतच आधुनिक काळातील युवकांमध्ये येणार नैराश्य,स्पर्धा परीक्षा, व्यसन, सायबर क्राईम,सोशल मीडिया, ट्रॅफिक चे नियम अशा विविध अंगी प्रश्न उत्तरेद्वारे जगताप यांनी अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून उदाहरणातून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्नाचे समाधान केले.

 या वेळेला प्राचार्य डॉ.संजय फुलझेले यांनी महाविद्यालयातील विशाखा समिती यांचेही उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर विद्यार्थी विकास परिषद,महिला अध्ययन व सेवा केंद्र, समाजशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग या सर्व विभागाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले, भाग्यश्री जगताप पीएसआय पोलीस स्टेशन आष्टी यांच्या हस्ते उद्घाटन करून वर्षभर राबवणाऱ्या कार्यक्रमाद्वारे समाजात एकता, अखंडता आणि व्यसनमुक्ती समाज निर्माण करण्याच्या प्रयत्न हे सर्व अभ्यास मंडळ करणार आहे असे आश्वासन दिले.

 या वेळेला प्रा. डॉ. भारत पांडे समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी मानव विद्या अभ्यास मंडळाचे उद्देश आणि वार्षिक कार्यकारणी सादर करून विद्यार्थ्यांना वर्षभर कार्यरत राहण्याचे आवाहन केले तर आधुनिक काळात महिलांवर विशेषतः युवतींवर अनोळखी व्यक्ती पेक्षा ओळखीच्या व्यक्तीकडून जास्तीत जास्त अत्याचार ब्लॅकमेलिंग किंवा धोका होतो आणि म्हणून युवतींनी ओळखीच्या आणि अनोळखी या लोकांपासून सावध राहून काही अडचणी असल्यास पोलीस स्टेशनशी किंवा महाविद्यालयीन विशाखा समितीशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.संजय फुलझले यांनी केले हा सोहळा संपन्न करण्याकरिता प्रा. विजया बल्की,प्रा. गबने , स्नेहल अनिल आत्राम,साक्षी सत्यपाल अंतरवार,वैशाली मशाखेत्री, मोनिका मुंजनकर,रुचिका गोडबोले यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार श्रावणी ताडशेट्टीवार मानले या वेळी प्रा.डॉ.राज मुसणे, प्रा. रवी गजभिये, राज लखमापूरे निलेश नाकाडे, संचित बाचाड, विनोद तोरे, मोहम्मद मुस्ताक यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !