शेतातील धान कापणी करीत असताना वाघाने केले महिलेला जागीच ठार
गडचिरोली:-
दिनांक:-19/10/2023 . आरमोरी रामाळा परीसरात शेतात धान कापणीसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना दिनांक 19 ऑक्टोंबर गुरुवारी दुपारी वाजताच्या सुमारास घडली.
ताराबाई एकनाथ धोडरे वय 55 वर्ष रा. काळागोटा आरमोरी
जिल्हा. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या त्या महिलेचे नाव आहे.
आज दुपारच्या सुमारास आरमोरी नजीकच्या रामाळा शेतशिवारात धान कापणी करत असताना ताराबाई हिच्यावर वाघाने हल्ला केला व तिला फरफटत नेऊन ठार केले. या घटनेची माहिती कळताच आरमोरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरमोरी रामाळा मार्गावर वाघाची दहशत असून वाघाच्या हल्ल्यात महीला ठार झाल्याने या परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.

