रानटी हत्तीने तुडवून - तुडवून शेतकऱ्यांस केले ठार

0
रानटी हत्तीने तुडवून - तुडवून शेतकऱ्यांस केले ठार 


गडचिरोली :-
गडचिरोली  मुख्यालयाजवळ  जंगली हत्ती चे आगमन होऊन शेताची प्रचंड नुकसान केली असताना शेतात आलेल्या रानटी हत्तींना जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याला रानटी हत्तीने सोंडेने उचलून खाली आपडले त्यानंतर त्याला तुडवून ठार केले ही घटना मंगळवार 17 ऑक्टोंबर रोजी 9 वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील दिभना शेत शिवारात घडली होमाजी गुरनुले 55 रा.दिभना असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे दिभनापासून दोन किमी अंतरावरील शेतशिवारात रानटी हत्तीच्या आल्याची माहिती दिभना गावात मिळाली.त्यानुसार होमाजी गुरनुले हे अन्य एका शेतकऱ्यांसोबत आपल्या शेतात रात्री 8 वाजताच्या सुमारास पीक संरक्षणार्थ व कळपाला जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी गेले होते रानटी हत्तींना शेतातून जंगलाच्या दिशेने वळवण्याच्या त्यांनी प्रयत्न केला.परंतु शेतात सर्वत्र हत्ती पसरले होते दरम्यान कळपातीलच एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्या दिशेने धाव घेतली त्यांनी एका झाडाच्या अडोसा घेतला परंतु हत्तीने होमाजी यांना सोंडेने उचलून जागी आपटले त्यानंतर तुडविले यात होमाजी गुरनुले हे  जागीच ठार झाले तर सोबतच्या शेतकरी आपल्या जीव वाचविण्यात यशस्वी झाला

 वनविभागा विरोधात रोष

.या भागात आठ दिवसांपासून रानटी हत्ती ठाण मांडून आहेत पण वन विभागाने  योग्य ती सतर्कता बाळगली नाही शेतकऱी  आपल्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून हत्तींना जंगलाच्या दिशेने पांगवण्यासाठी गेले होते तेव्हा हा अनर्थ घडला

 रात्री 9.30 वाजता घटनास्थळी पोलीस दाखल झाले.त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचनामाची कार्यवाही झाली वनविभागाचे अधिकारी कार्यकर्ते उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने शेतकऱ्यानी तीव्र रोष व्यक्त केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !