कुनघाडा येथे युरीया खताचा काळाबाजार, शेतकऱ्यांची लूट

0
 कुनघाडा येथे युरीया खताचा काळाबाजार, शेतकऱ्यांची लूट 


२६६ रुपयाची युरीया बॅग ५५० रुपयाला विक्री 

आमदार डॉ.देवराव होळी यांनी कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व विक्री केंद्र चालकावर कारवाई करण्याची केली मागणी 

गडचिरोली:-
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथील एका कृषी केंद्रात युरीया खताचा काळाबाजार होत असल्याची माहिती आमदार डॉ देवराव होळी यांना मिळाली त्यानुसार कुनघाडा येथे प्रत्यक्ष जाऊन खत विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली असता युरीया खताची बॅग २६६ रुपये विक्री करायची असताना ५५० रुपयाला विक्री केली जाते आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची फार मोठी लुट कृषी केंद्रधारक करीत आहे हे निदर्शनास आले तेव्हा आमदार डॉ देवराव होळी यांनी कृषी केंद्रधारक, चामोर्शी कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !