पॅरा शुटिंग चॅम्पियनशीप दिल्ली येथे प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या श्वेता कोवेचा बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते सत्कार
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली:-
दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे गडचिरोली जिल्हा प्रशासन दिव्यांगा दारी आले आहे यावेळेस मंत्री दर्जा असलेले बच्चू कडू यांच्या हस्ते गडचीरोली जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे शिक्षण घेत असलेल्या श्वेता कोवे चा सत्कार करण्यात आला , दिव्यांगाच्या उत्कृष्ट खेळाडूंना तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला बच्चु भाऊंनी दिव्यांगाचा आधार असल्याचे दाखवून दिले दिव्यांग कोणत्याही खेळात कमी नाही असे या कार्यक्रमात त्यांनी संबोधले आहे तसेच यावेळेस मंचावर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोलीआयुषी सिंह व अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर खंडाते आदी मान्यवर उपस्थित होते
श्वेता कोव्हे हीच्या सोबत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य संजय फुलझले व क्रीडा प्राध्यापक श्याम कोरडे उपस्थित होते.

