भरधाव ट्रकने संपविले अवघे कुटूंबच

0
भरधाव ट्रकने संपविले अवघे कुटूंबच  



प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

चंद्रपूर / राजुरा-:

 राजुरा ते सास्ती मार्गावरील धोपटाळा गावाजवळ एका भरधाव वेगाने जाणा-या ट्रक चालकाने तिघांना चिरडले. यात दुचाकीस्वार आई-वडील व मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घडला. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती कळते.

धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे निलेश वैद्य वास्तव्याने राहत होते. सकाळी आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी ते काम आटपून घरी येत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ राजुरा कडून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकला धडक दिली धडक एवढी जोरदार होती की त्यात वैद्य परिवाराचा चकानाचुर झाला. तर समोर याच ट्रकने दोन मोटार सायकलस्वारांना धडक • दिली यात रामपुर येथील दोघेही जखमी असून जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलें असता प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

या भीषण अपघातात 35 वर्षीय निलेश मंगेश वैद्य, 30 वर्षीय रुपाली निलेश वैद्य व 3 वर्षीय राही यांचा जागीच मृत्यू झाला, याच ट्रकने समोर जाऊन प्रज्ञा प्रशाद टगराफ (33 वर्ष) व प्रसाद राजाबाई टगराफ (40 वर्ष) दोन्ही रामपुर येथील यांना धडक दिल्याने दोघेही जखमी आहे. जखमींना चंद्रपूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.

नागरिकांनी ट्रकचालक यांना पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे..

अपघात झाल्यावर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी करीत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती, मात्र वेळीच दंगा पथक पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !