गोदावरी नदीत दोन युवकांचा बुडून मृत्यू

0
गोदावरी नदीत दोन युवकांचा बुडून मृत्यू 



क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी

 सिरोंचा:-
महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील लागूनच गोदावरी नदी पात्रात दोन जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना दिनांक 13 ऑगस्ट रविवारी दुपारी अडीच वाजताच्या घडली.. सुमन राजू सेट्टी (१५) रा. आसरअल्ली व हिमांशू मून (२२) रा. न्यू बालाजी नगर नागपूर अशी मृतकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता. दरम्यान, आज सकाळी तो सुमन मुसेट्टी व नगरम येथील आपल्या मित्रांसह कालेश्वर येथे दर्शनासाठी गेले. यावेळी नदीपात्रात आंघोळीचा मोह त्यांना आवरला नाही यावेळी हिमांशू व सुमन , कार्तिक नलिन पडाला व रंजित पडाला हे पाच जण गोदावरी नदीवरील नगरम घाटाकडे आंघोळीचा बेत करून निघाले. येथे गेल्यानंतर आंघोळीसाठी सर्वजण नदीपात्रात उतरले. पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने सुमन मंसेट्टी व हिमांशू मून व अन्य एकजण खोल पाण्यात बुडू लागले. सुमंत मुसेट्टी व हिमांशू मुन यांचा मृत्यु झाला तर कार्तिक, नलीन पडाला व रंजीत
पडाला हे तिघेजण कसेबसे पाण्याबाहेर निघाले. यांना वाचवण्यासाठी सिरोंचा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमने प्रयत्न केले मात्र त्यांना यश प्राप्त करू शकले नाही पुढील तपास सिरोंचा पोलिस करत आहेसिरोंचा ता प्र:- महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील सिरोंचा - तालुक्यातील लागूनच गोदावरी नदी पात्रात दोन जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना दिनांक 13 ऑगस्ट रविवारी दुपारी अडीच वाजताच्या घडली. . सुमन राजू मंसेट्टी (१५) रा. आसरअल्ली व हिमांशू मून (२२) रा. न्यू बालाजी नगर नागपूर अशी मृतकांची नावे आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !