गुणवंत विद्यार्थ्यांचा व पोलीस दलात दाखल विद्यार्थ्यांचा सत्कार
आष्टी (प्रतिनिधी ):-
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस स्टेशन आष्टी तर्फे आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य कृषी मेळावा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे होते. उदघाटक म्हणून तालुका कृषी अधिकारी स्वाती परदेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बेबी बुरांडे , वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा परशुरामकर , डॉ. अक्षता आगरकर ,पत्रकार अशोक खंडारे , डी.डी.रॉय , सुधीर फरकाडे , गणेश शिंगाडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना स्वाती परदेशी म्हणाल्या देशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे.शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा या मेळाव्यातून लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना पोलीस निरीक्षक गावडे म्हणाले आदिवासी समाजातील कला , कौशल्य या मेळाव्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचले पाहिजे.तसेच कृषी मेळाव्यातून शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा त्यासाठी आष्टी पोलीस स्टेशन तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला तसेच आष्टी येथील गुणवंत विद्यार्थ्यांना व पोलीस दलात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी पोलीस विभाग नेहमी कटिबद्ध राहील.
या कृषी मेळाव्यात कृषी विभागातर्फे ३०० झाडे वाटप करण्यात आली. तसेच बी बियाणे व कीटकनाशके यांचेही वाटप करण्यात आले. त्यानंतर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डोंगरे यांनी केले , संचालन पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांनी केले. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले , पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या देखरेखीखाली सर्व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.
यांचा झाला सत्कार( आदिवासी गुणवंत विद्यार्थी ) इयत्ता १२ वी मधून रोशनी मधुकर आलाम (महात्मा फुले ), श्वेता दिवाकर मडावी (राजे धर्मराव ) १० वी मध्ये आश्विनी गावडे (महात्मा फुले), ओम दिपक शेमले ( राजे धर्मराव हायस्कूल) या विद्यार्थ्यांचा शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलिस दलात दाखल विद्यार्थ्यांचा सत्कार ---अमित निमसरकर , पवन ठुसे , प्रदीप सरकार (एस आर पी एफ) , प्रवीण घ्यार , सुरज टेंभरे यांचा उपस्थित मान्यवरांनी शाल , श्रीफळ देऊन सत्कार केला. पोलीस दलात निवड झालेला विद्यार्थी प्रवीण निमसरकर , पवन ठुसे यांनी मनोगत व्यक्त केले.

