सोपानदेव म्हशाखेत्री उपसंपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली : -
जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे नदी-नाल्यांना पूर नाही. अशा स्थितीत शनिवारला एका इसमाचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना धानोरा तालुक्यात आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील चातगाव नजिकच्या दुधमाळा येथील रुषी रामजी दुगा हे शनिवार दि.5 रोजी गुरे चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी 4.30 ते 5 वाजताच्या सुमारास कठाणी नदी जवळ गुरे चारत आसतांना अचानक एक गाय पाण्यात वाहून जातांना दिसली तेव्हा रुषीने पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली व गाईला वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि तोही बुडून मरण पावला
घटनेचा तपास धानोरा पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे

