अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी:-
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 15/08/ 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्यांचा 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ रमेश सोनटक्के राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग प्रमुख आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पी के सिंग यांनी संयुक्त हस्ते ध्वजारोहण करून तिरंगी ध्वजाला सलामी देण्यात आली महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ पी के सिंग यांनी भारतीय स्वातंत्र्याचा 76 दिन साजरा करत असताना विद्यार्थ्यांना व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वातंत्र्यासाठी अनेक थोर महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले
डॉ रमेश सोनटक्के यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले प्रा राहुल आवारे यांनी या सर्व कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ प्रदीप कश्यप यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अपर्णा मारगोनवार डॉ एम पी सिंग डॉ सोनाली धवस डॉ दीपक नागापुरे डॉ प्रकाश राठोड प्रा महेश शिल्लमवार प्रा सुबोध साखरे प्रा सचिन मुरकुटे प्रा जया रोकडे प्रा राहुल आवारी प्रा कवींद्र साखरे कुमारी सविता गारगाटे संदीप मानापुरे रवींद्र झाडे अविनाश जीवतोडे विजय खोब्रागडे कुमारी शुभांगी डोंगरे रमेश वागदरकर श्रीमती उषा माहूरपवार श्रीमती पौर्णिमा गोहने व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

