जिल्ह्यात एका तरुणाने
गळफास घेऊन केली आत्महत्या.
अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
वैरागड : -
येथील आंबेडकर वॉर्डांत रहवासी असलेला युवक संदिप काशिनाथ कांबळे (वय ४२ वर्षे) याने नैराश्याच्या भावनेतून स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज दि. १७ ऑगस्ट रोजी घडली.
घर बाधकामगार म्हणून मजुरीचे (मिस्त्री) काम करणारा संदिप कांबळे हा युवक अनेक दिवसापासून नैराश्याच्या भावनेतून जीवन जगत होता. यातच त्याला मद्य- पाणाचा वेसन जडला होता. मृतक आणि त्याची आई असे दोघेच घरी राहायचे आज आई शेतावर गेल्याचे पाहून त्याने घरातच दुपारी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. मृतक घरी एकटाच असल्याने संध्याकाळी माहिती उघडकीस आली. याबाबत पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर यांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच आरमोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व प्रेतास उत्तर तपासनीस उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे पाठविण्यात आले. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार जयपाल बांबोळे आणि शिपाई विलास कुमरे करीत आहेत.

