अनाथ दोन बहिणींसाठी आधार बनले आष्टीचे पोलीस अधिकारी

0
अनाथ दोन बहिणींसाठी आधार बनले आष्टीचे पोलीस अधिकारी 




आई- वडिलांचे छत्र बालपणी हरपले: तीन वर्षापासून उचलत
आहेत शिक्षणाचा खर्च


अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी: -
आई-वडीलांचे छत्र हरपल्यानंतर दोन लहान  अनाथ झालेल्या  बहिणींच्या मदतीला धावून आले  आष्टीचे पोलिस स्टेशनचे तत्कालीन  पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल त्यांनी या दोन्ही बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे तसेच उदर निर्वाहा करीता सूद्धा मदत करीत होते 

आष्टी येथील दौलत बारसागडे हे आपल्या पत्नीसोबत राहात होते. त्यांना प्रिन्सी व खुशी या दोन मुली होत्या. घरची परिस्थिती
 अत्यंत हलाखीची जेमतेम कसेतरी कुटुंब जगत होती. अशाही परिस्थितीत त्यांचे कुटुंब आनंदाने राहात होते. पुढे दौलत बारसागडे यांना कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने ग्रासले आणि २०१६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार गेल्यानंतर खचून न जाता प्रिन्सी व खुशीची आई दर्शना मुलींना घेऊन भाड्याच्या खोलीत राहात होती.  गडचिरोली ला एका कामानिमित्ताने  दुचाकीने जात असताना दर्शनाचा २०२० मध्ये अपघाती मृत्यू झाला.

आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रिन्सी व खुशी या दोघी बहिणी अनाथ झाल्या. त्यावेळेस प्रिन्सी ही सातवी व खुशी ही चौथीमध्ये शिकत होत्या. या दोघी बहिणी आष्टी येथे त्यांच्या आजीसोबत किरायाच्या घरात राहात होत्या. आर्थिक मदतीसाठी तिच्या आजीने आष्टी येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांची भेट घेतली. पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि त्यांनी या दोन्ही बहिणींना आर्थिक मदत केली. शिवाय या दोन्ही बहिणींचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्यांनी उचलला. त्यानंतर त्यांची  बदली पुणे येथे झाली तेव्हा ही जबाबदारी पोलिस उपनिरिक्षक वैशाली कांबळे यांनी उचलली.
आज प्रिन्सी ही दहावी तर खुशी ही सातवीमध्ये शिशू मंदिर
पब्लिक स्कूल आष्टी येथे शिक्षण घेत आहेत. पुढेही या दोघी बहिणींना आर्थिक मदत करीत राहणार असे पोलिस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांनी वैनगंगा वार्ता १९ पोर्टल चे मुख्य संपादक अशोक खंडारे याचेशी या विषयावर चर्चा करताना सांगितले पीएसआय वैशाली कांबळेनी उचलले पालकत्व २०२० मध्ये ठाणेदार निर्मल यांची बदली झाली. त्यानंतर त्यांनी या दोघींच्या शिक्षणाची जबाबदारी पीएसआय वैशाली कांबळे यांच्यावर सोपविली. तीन वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे या दोघी बहिणींचा शिक्षणाचा खर्च करीत आहेत. कांबळे या दीड वर्षे  प्रसुती रजेवर असतांनाही त्यांनी आर्थिक मदत केली होती तसेच पुढेही त्यांना मदत करणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सदर भगिनींना सामाजिक दायित्व जोपासत समाजसेवी संस्थांनी करायला पुढे यावे अशी आशा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !