इंदिरा गांधी विद्यालय तथा क. महाविद्यालय येनापूर येथे छात्रसंघ पदाधिकारी निवडणूक उत्साहात
प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता
येनापूर- इंदिरा गांधी विद्यालय तथा क. महाविद्यालय, येणापूर येथे मोठ्या उत्साहात छात्रसंघ पदाधिकारी निवडणूक घेण्यात आली हि निवडणूक E.V.M. पद्धतीने घेण्यात आली जणेकरून विद्यार्थ्यांना निवडणूकी बद्दल जागरूकता निर्माण होईल या निवडणूकीत पुढील प्रकारे मंत्रीमंडळ निवडण्यात आले
शालेय मुख्यमंत्री . कुमारी नंदिनी संजय झाडे (वर्ग 10वा)
सकाळ पाळी
उपमुख्यमंत्री राजदीप विनोद गौरकार
सांस्कृतिक मंत्री कुमारी श्रुती वासुदेव झाडे
क्रीडामंत्री अंशू वामन सिडाम
पर्यावरण मंत्री कुमार श्रुती गजानन भोगरे
पर्यटन मंत्री तन्मय हंसराज तावाडे
महिला मंत्री कुमार आरुषी विनोद
बर्लावार
दुपार पाळी
उपमुख्यमंत्री कुमारी प्रीतू शालिक चिताडे
सांस्कृतिक मंत्री कुमारी सेजल महेंद्र डाहूले
क्रीडामंत्री जालिंदरनाथ दिलीप पिरसिगुलवार
पर्यावरण मंत्री कुमार शिवानी दादाजी नेवारे
पर्यटन मंत्री समीर सुरेश राऊत
महिला मंत्री कुमारी छकुली जगन्नाथ भोगडे
विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक वाकूडकर,गोंडवांना शिक्षण मंडळाचे संचालक अतुल येलमुले पर्यवेक्षक श्री वासूदेव गोंगले, ज्येष्ठ शिक्षक श्री दिलीप टेप्पलवार श्री इसाक कुरेशी तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे संचालन श्री कमलकिशोर कन्नाके यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष श्री नागोबाजी पाटील पेडापल्लीवार सचिव श्री जयंतराव येलमूले तथा सर्व सदस्यांनी . विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले
निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता निवडणूक आयुक्त म्हणून श्री विनय कल्लूरवार श्री अजय लोंढे आणि श्री गिरीश तुम्पल्लीवार तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.

