. धानोरा तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सचिव देवनाथ मशाखेत्री
यांच्या वाढदिवसानिमित्त केला शुभेच्छांचा वर्षाव
सोपानदेव म्हशाखेत्री उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
धानोरा येथील ज्येष्ठ नागरिक संस्था धानोराची सभा माळी समाजाचे समाजभवनात संस्थेचे तालुका अध्यक्ष मुकाजी भंडारे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून गडचिरोली जिल्हा जेष्ठ नागरिक संस्थेचे सहसचीव सोपानदेव म्हशाखेत्री , प्रमुख उपस्थिती लालाजी भुरसे ,कोथलोजी आतला ,सखाराम लेनगुरे, कवडूजी राकडे, विश्वास जोशी ,नाजुकराव उंदीरवाडे ,मधुकर रामपूरकर ,खुशालराव ढवळे ,काशिनाथ मशाखेत्री
,लिलाबाई मोहुर्ले, तारा कुरुडकर, रत्नमाला सोरते,जाईबाई हलामी,मिरा मोहू्र्ले, शर्मिला मशाखेत्री, मारुती मोहुर्ले सहसचिव ,व बहुसंख्य सभासद उपस्थित होते. मागील सभेचे इतिवृत्त सचिवाने वाचून दाखविले. जिल्हा सहसचिव सोपानदेव मशाखेत्री यांनी क्रांती दिनाचे महत्त्व व मानवी मूल्यांच्या सेवांचे चित्रण उभे करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी संस्थेचे सल्लागार लालाजी भूर्से,विश्वास जोशी यांनी संमायोचीत मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव देवनाथ मशाखेत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, केक कापून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आली .यावेळी देवनात मशाखेत्री व शर्मिला मशाखेत्री या उभयतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे अंशी वर्षीय लालाजी भुरसे यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा संस्थेच्या सभासदांनी दिल्या .सभेत श्रावण बाळ योजनेची वयोमर्यादा साठ वर्षे असावी व महाराष्ट्रात एसटी बस सेवा विनामूल्य प्रवास करणाऱ्यांचे वय 70 वर्षाचे असावे असे एकमताने ठरविण्यात आले .अधिकाधिक ज्येष्ठांनी संस्थेत सहभाग दर्शवावा असे आवाहन अध्यक्ष स्थानावरून मुकाजि भेंदरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार सचिव देवनाथ मशाखेत्री यांनी मानले.

