पोटच्या मुलीला कोईत्याने वार करून बापानेच संपविले
अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
नांदेड :-
बापाने केली पोटच्या पोरीची हत्या;कोयत्याने सपासप वार करत चिरले, मिळालेल्या माहितीनुसार जन्मदात्या बापाने दहावीत शिकणाऱ्या मुलीची निर्दयीपणे हत्या केली. मुलीने लव्ह मॅरेजचा हट्ट धरला होता. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलिस स्टेशन अंतर्गत मनु तांडा येथे 2 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. मुलीचे ज्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते त्याच तरुणासोबत लग्नाचा हट्ट केल्याने अण्णाराव राठोड यांनी कोयत्याने सपासप वार करत हत्या केली. हत्येनंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचत त्याचदिवशी अंत्यसंस्कार उरकले. पोलिसांना कुणकुण लागताच अधिक तपास केल्यावर आरोपी वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे
