गडचिरोली जिल्हा रा.काँ.महिला पदाधिकारी यांची वार्षिक आढावा बैठक पुणे येथे संपन्न

0
गडचिरोली जिल्हा रा.काँ.महिला पदाधिकारी यांची वार्षिक आढावा बैठक पुणे येथे संपन्न



अशोक खंडारे मुख्य संपादक

गडचिरोली :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली.
सदर आढावा बैठकीत राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान, प्रदेश महिला अध्यक्षा विद्या चव्हाण, राष्ट्रीय महिला समन्वयक डॉक्टर आशा मिरगे, अमरावती विभागीय अध्यक्षा वर्षा निकम नागपूर विभागीय अध्यक्षा शाहीनभाभी हकीम उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रीया सुळे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची पदाधिकारी महिलांना मार्गदर्शन केले 
सदर बैठकीत गडचिरोली जिल्हा महिला पदाधिकारी अहेरी विधानसभा अध्यक्षा ज्ञानकुमारी कौशी, अहेरी तालुका अध्यक्षा सारिका गडपल्लीवार , एटापल्ली तालुकाध्यक्ष ललिता मडावी, भामरागड तालुका महीला अध्यक्ष नंदा नारनवरे, आरमोरी तालुका महिला अध्यक्ष ज्योती गुठखे, कोरची तालुका महिला अध्यक्ष गिरीजा कोरेटी, जिल्हा महिला सचिव पदाधिकारी गीता दुर्गे, नागेपली शहर महिला अध्यक्ष माया सुनकर, सगुना तिमा, आदी महिला उपस्थित होत्या. जिल्हा महिला पदाधिकारी व तालुका महिला पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !