चंद्रपूर :-
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील - शेख कुटुंबाचा चंद्रपूरात भीषण अपघात झाल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली शुक्रवारी 23 जून ला दुपारी 2 वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून शेख कुटुंब आज परतीच्या प्रवासावर निघाले होते, सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु होती.
शेख कुटुंब आपल्या चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 29 बी. सी. 6321 ने घुग्गुस जवळ पोहचले असता वाहन अनियंत्रित झाले, त्यांचं चारचाकी बोलेरो वाहन दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला भीषण धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की बोलेरो वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले. या भीषण अपघातात शेख कुटुंबातील रफीक नबी वस्ताद शेख, पत्नी संजिदा रफीक शेख युसूफ नवी वस्ताद शेख, पत्नी मुमताज युसूफ शेख रा. मारेगाव हे जागीच ठार झाले.
मृतदेह काढताना सुद्धा पोलीस व वाहतूक प्रशासनाला अनेक समस्येचा सामना करावा लागला, मृतदेह बाहेर काढताना त्यांना गॅस कटरचा उपयोग करावा लागला. दरम्यान मृतक थोरला भाऊ रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे तर लहान भाऊ युसूफ शेख याच्या पश्चात दोन मुली आहे.
सदर भीषण अपघाताची माहिती मारेगाव येथे पोहचली असता नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत

