पोभुर्ण्यातील बांधकाम विभागाचा अभियंता ड्रग्स प्रकरणात अडकला एनसीबीच्या जाळ्यात

0
पोभुर्ण्यातील बांधकाम विभागाचा अभियंता ड्रग्स प्रकरणात अडकला एनसीबीच्या जाळ्यात 


अशोक खंडारे मुख्य संपादक

चंद्रपूर:- 
पोस्टाच्या माध्यमातून लिसर्जिक एसिड डॉयथाइलैमाइन (LSD) ड्रग्स बोलवणाऱ्या व सेवन करणाऱ्या एका बांधकाम अभियंत्याला दिल्ली येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो दिल्लीच्या चमुने पोंभूर्ण्यातून अटक केली आहे. सदर कार्यवाहीने पोंभूर्ण्यात ड्रग्सचे इंटरनॅशनल तार जोडले गेले आहे. सदर कार्यवाही गुरूवारला करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्याला दिल्ली येथे नेण्यात आले आहे.
दिल्ली येथे अमली पदार्थाच्या तस्कराच्या आरोपाखाली एनसीबीने कार्यवाही करून आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्यात आणखी किती लोकांचा समावेश याचा तपास सुरू होता. या प्रकरणातील काहींना वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील संबंधीताने लिसर्जिक एसिड डायथाइलैमाइन (LSD) हे ड्रग्स पार्सलद्वारे बोलवल्याची माहिती एनसीबीला प्राप्त होताच. पोंभूर्णा येथील पीडब्लूडी कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता हेमंत बिचवे यांना पोंभूर्णा पोलिसांच्या मदतीने एनसीबीच्या चम्मूने पार्सल स्विकारताना ताब्यात घेतले.

सदर पार्सलमध्ये ३० हजार किमतीचे ३.१८ ग्रॅम (LSD) हस्तगत केले. संबंधीताच्या रुमवरून काही साहित्य ताब्यात घेण्यात आले. संबंधीताची चौकशी करून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोंभूर्णा न्यायालयात हजर करून पुढील तपास व कार्यवाहीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !