म.ज्यो.फुले हायस्कूल आष्टी चा निकाल 90.90

0
म.ज्यो.फुले हायस्कूल आष्टी चा निकाल 90.90%



आष्टी (अशोक खंडारे):-
नुकत्याच महाराष्ट्र राज्य एस एस सी बोर्ड विभाग नागपूर चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल चा निकाल  90.90%
लागला असून त्यामध्ये शाळेमधून सर्वप्रथम येण्याचा मान अंकित वाशिक बावणे याने 88.20% घेऊन मिळवला तर अनुक्रमे कुमारी अनुक्षा किशोर राऊत हिला 86% मिळाले व कुमारी स्नेहल रविकुमार बुगावार हिला 84.40% प्राप्त झाले. या परीक्षेला एकूण 88 विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून  प्रावीण्य श्रेणीमध्ये 17 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीमध्ये 23 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निकालाच्या टक्केवारीचा वाढता आलेख कायम ठेवला असून या घवघवीत यशाबद्दल वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे  सचिव बबलूभैया हकीम तसेच त्यांच्या सहचारिणी शाहीनभाभी हकीम यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून अभिनंदन केले व त्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई, पर्यवेक्षक 
घाटबांधे संपूर्ण प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर प्राचार्य किशोर पाचभाई त्यांचे सहकारी शिक्षक यांनी प्रावीण्य प्राप्त केलेल्या अंकित वाशिक बावणे या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्याला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !