आष्टी येथे समाजप्रबोधन संघटना करणार गुणवंत विघार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
अशोक खंडारे मुख्य संपादक
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील समाज प्रबोधन कर्मचारी संघटना गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाज प्रबोधन कर्मचारी संघटना यांनी दि .२६ जूनला सकाळी १२ वा. आष्टी येथील महाबोधी बुद्ध विहार येथे गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सम्पन्न होत आहे
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष दिलीप बारसागडे तर उद्घाटक जेष्ठ समाजसेवक सुंदरदास उंदिरवाडे यांचे हस्ते सम्पन्न होत आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर,कृषी विस्तार अधिकारी व्हाय. पी .लाकडे यांचे मार्गदर्शन होणार आहे
धम्मदिप समाज मंडळ, रमाबाई उपासीका महिला मंडळ, सावित्रीबाई फुले सार्वजनिक महिला मंडळ, बुद्ध विहार बांधकाम समिती, धम्म चेतना बौद्ध समाज मंडळ आष्टी यांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले जात आहे
या कार्यक्रमाला परिसरातील बौद्ध बांधवांनी बहुसंख्य जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन समाज प्रबोधन कर्मचारी संघटना अध्यक्ष प्रकाश डोर्लीकर, सचिव हरिदास मेश्राम यांनी केले आहे

