शारीरिक संबंधाबाबत 16 वर्षीय मुलगी निर्णय घेण्यास सक्षम

0
 शारीरिक संबंधाबाबत 16 वर्षीय मुलगी निर्णय घेण्यास सक्षम 




शिलाँगः-

 मेघालय उच्च न्यायालयाने एका पॉक्सो प्रकरणात महत्त्वाचे मत मांडले आहे. सेक्सच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी 16 वर्षांची मुलगी सक्षम असते, असे मत न्यायालयाने मांडले. यासोबतच कोर्टाने पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेशही दिले.

सुत्रानुसार, एका व्यक्तीवर 16 वर्षांच्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हे संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा तरुणाने केला होता. या तरुणाने आपले संबंध सहमतीने झाल्याचे म्हटले होते. तसेच, या मुलीनेही कोर्टात दिलेल्या आपल्या बयानात दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले होते. त्यामुळे शारीरिक संबंधांवेळी कोणतीही जबरदस्ती केली गेली नव्हती. त्यामुळे, याकडे अत्याचार म्हणून पाहू नये, अशी मागणी या तरुणाने केली होती.

मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाचा दिला दाखला

मेघालय उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला दिला. या घटनेतील पीडितेच्या वयातील व्यक्तींचा मानसिक आणि शारीरिक विकास पाहता, लैंगिक संबंधांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सक्षम असा कोर्टाने सांगितले. न्यायमूर्ती डब्लू, डिएंगदोह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !