अशोक खंडारे मुख्य संपादक
कूरखेडा-
उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा येथे आज शनिवार रोजी नूकताच जिल्हा सामान्य रूग्णालयाचा प्रभार स्विकारलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोलंकी यानी रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करीता भेट दिली ही संधी साधत येथील पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळ घेऊन जाऊन डॉ. सोलंकी यांची भेट घेत त्याना येथील प्रलंबीत समस्या निदर्शनात आणून दिल्या व त्या मार्गी लावण्याची मागणी केली
५० खाटांची क्षमता असलेल्या येथील उपजिल्हा रूग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकारी प्रतिनियूक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे सेवा बजावत असल्याने येथील आरोग्य व्यवस्था बिघडलेली आहे डॉक्टरांच्या कमतरते मूळे येथील बाह्य रूग्न विभागात एम बी बी एस डॉक्टर ची सेवा उपलब्ध होत नाही कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचा साहायानेच येथील कारभार चालत आहे त्यामूळे दर्जेदार आरोग्य सेवा रूग्नाना मिळत नाही स्थानिक स्तरावरच उपचाराची सूविधा असतानाही शूल्लक कारणाकरीता रेफर टू गडचिरोली हा प्रकार वाढलेला आहे यामूळे रूग्न व त्यांचा कूटूंबियाना अधिकचा आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागतो, रूग्नालयात ट्रामा सेंटर मंजूर आहे मात्र आवश्यक जागा व प्रशासकीय लालफीताशाहीत अटकलेला हा उपक्रम तातडीने क्रायान्वीत करण्यात यावा तसेच कोट्यावधी रूपये खर्च करीत सती नदीचा काठावर बांधकाम करण्यात आलेली आरोग्य कर्मचारी वसाहत तिथे अद्याप पाण्याची उपलब्धता होत नसल्याने मागील तिन ते चार वर्षापासून धूळखात पडून आहे येथे पाण्याचा उपलब्धते करीता तातडीने प्रशासकीय स्तरावर पाठपूरावा करीत प्रश्न मार्गी लावण्यात यावा या मागणी करीता शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक यांचाकडे चर्चे द्वारे तगादा लावला व सर्व प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अमीत ठमके हे सूद्धा उपस्थित होते शिष्टमंडळात भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक ॲड उमेश वालदे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रविन्द्र गोटेफोडे सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे रूग्न कल्याण समीती सदस्य विवेक निरंकारी रूग्न कल्याण समीती सदस्य सिराज पठान, वैभव बंसोड यांचा समावेश होता

