जंगलात लपवून ठेवलेली 1 लाख 80 हजारची अवैध दारू जप्त
एटापल्ली पोलीसांची कारवाई
अशोक खंडारे मुख्य संपादक
एटापल्ली :-
तालुक्यातील 4 किलोमीटरअंतरावर असलेले करेम ते गुरुपल्ली या जंगल परिसरात पोलीस पथकांना मिळालेल्या माहिती नुसार बुधवारला दिवसा दुपार 3 वाजता चे सुमारास अवैध दारू साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली असता रविराज कांबळे यांनी पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे यांना कळविले त्याआधारे पोलीस पथकासह मौजा करेम ते गुरुपल्ली जंगल परिसरात दोन पंचा सह पोलीस पथक करेम ते गुरूपल्ली जंगल परिसरात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी एक महिला व दोन पुरुष दिसून आले सदर ठिकाणी जाऊन त्यांचे नाव विचारले असता महिला नामे संगीता बदकया मडावी राहणार करेम व दोन पुरुष नामे दौलत दशरथ तलांडे, नामदेव पोद्दी मडावी दोन्ही राहणार करेम तालुका
एटापल्ली नमूद महिला व दोन पुरुष यांना या ठिकाणी काय करत आहात असे विचारले असता उडवा उडवी ची उत्तरे देत होते त्यांच्यावर संशय आल्याने सदर जंगल परिसरात पोलीस स्टाफ व पंच असे मिळून शोध घेत असताना जंगलात एका झाडाच्या झुडपात वीस खरड्या रंगाचे बॉक्स त्यावर रॉकेट देशी दारू संत्रा असे लिहिलेले प्रत्येक बॉक्समध्ये 100 प्लास्टिक 90 एम एल मापाच्या निपा त्यावर रॉकेट देशी संत्रा बॅच नंबर 050 जुन 2023 असे नमूद असलेले एकूण 2000 नग प्लास्टिक निफा अवैध विक्री किंमत 1,80, 000रु. चा माल अवैधरिता विनापरवानगी विक्रीकरिता मिळून आला. सदरचा मुद्देमाल मनोज जगदीश मुजुमदार यांनी विक्री साठी टाकला असून वर नमुद इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

