डोंगरगाव येथे सोमवारी पालक मेळाव्याचे आयोजन
अशोक खंडारे मुख्य संपादक
डोंगरगाव (ता. मंगळवेढा) -:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव या शाळेत सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता पालक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांनी दिली.
कोरोना काळात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक दृष्ट्या ही हेळसांड झाली. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी व शाळेसंदर्भातील भौतिक सुविधा या बाबत या पालक मेळाव्या मध्ये चर्चा होणार असून सर्व पालकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे अवाहन मुख्याध्यापक पाटील यांनी केले आहे.
सदर पालक मेळाव्यास सरपंच सारिका खिलारे, पोलीस पाटील पांडुरंग खडतरे, उपसरपंच प्रदीप चौगुले, ग्रामसेवक सुशांत कसबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. के. साखरे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

