अशोक खंडारे मुख्य संपादक
चंद्रपूर :-
कैद्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसासोबत भयंकर प्रकार घडला आहे. संबंधित पोलिसाने दारू प्राशन केले होते. यामुळे कैद्याला राग आला आणि त्याने रुग्णालयातील झाडू उचलली आणि पोलिसाला बदडले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून पोलिसाला सोडवलं. या घटनेचा व्हिडिओ समाज
माध्यमात व्हायरल झाला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.चंद्रपूर जिल्हा कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून एक कैदी आहे. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघळले आहे. मंगळवारी ( १६ मे) रोजी कैद्याची प्रकृती खालावली होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांला मात्र, ज्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रुग्णालयात नेले तो पोलीस स्वतः दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कैद्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले. त्याने हॉस्पिटलमध्ये पडलेला झाडू उचलला आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
चंद्रपूर जिल्हात खळबळ, कैद्याची पोलिसाला झाडूने मारहाण
व्हिडिओमध्ये तो पोलिसांना शिवीगाळ करत आहे. तर दुसरीकडे पोलिसांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी बचाव करताना दिसत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात खळबळ उडाली आहे.


