रानडुक्कराची दुचाकीला धडक , पोलीस अंमलदाराचा मृत्यू

0
रानडुक्कराची दुचाकीला धडक , पोलीस अंमलदाराचा मृत्यू


प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक 
मूल:-
 रानडुकर आडवा आल्याने दुचाकी वरुन खाली कोसळून एका पोलिस अंमलदाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी सांयकाळी 6 वाजताच्या समारास घडली. सदर घटना पोंभुर्णा मार्गावरील अंधारी नदीजवळ घडली. मृत पोलिस अंमलदाराचे नाव विकास गणपत खडके (वय 36) असे असून ते पोंभुर्णा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते.
पोलिस ठाण्यातील डयुटी टपाल घेऊन मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात शुक्रवारी आले होते. टपाल देऊन पोंभूर्णा येथे मोटार सायकलने परत जात असताना सुशी दाबगाव गावाच्यापुढे अंधारी नदीच्या जवळपास रानडुकर आडवा आल्याने अपघात झाले. अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !