भोंदुबाबा आला आयुर्वेदिक औषधोपचार करण्याला आणि पळवून नेले अल्पवयीन मुलीला

0
 भोंदुबाबा आला आयुर्वेदिक औषधोपचार करण्याला आणि पळवून नेले अल्पवयीन मुलीला



अशोक खंडारे मुख्य संपादक


केज (प्रतिनिधी) : बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आयुर्वेदिक औषधोपचार करण्याच्या बहाण्याने आलेल्या भोंदू महाराजाने एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. याप्रकरणी भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत 
मिळालेल्या माहितीनुसार,
 बीडच्या केज तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका आजारीव्यक्तीवर आयुर्वेदिक 
औषधोपचार करण्यासाठी एक भोंदू महाराज आला होता. अल्पवयीन मुलगी आपल्या आजारी वडिलांची देखभाल आणि सेवा करत होती. ही मुलगी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. त्याच वेळी या भोंदू महाराजाने फूस लावून तिला पळवून नेले.
भोंदू महाराज या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून पळून गेला. ही घटना अल्पवयीन मुलीच्या काकाने पाहिली. त्यांनी या भामट्या महाराजाचा पाठलाग करुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते कुठेच दिसले नाही. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी युसुफवडगाव येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी माऊली धोंडीराम भोसले या भामट्या महाराजाविरोधात गुन्हा दाखल केला. या महाराजाचा आणि मुलाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !