लाठी येथील नंदू माहूरे यांनी विद्युत
कर्मचारी राजू पावडे यांना मोबाईल फोन करून शेतात जिवंत विद्युत तार पडली.....
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
वणी:- २ मे रोजी लाठी गावातील ९ वर्षीय पियुष संभा माहुरे हा गावालगतच्या शेतात मुलांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला असता त्याला शेतात पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा शॉक लागून त्याचे हात आणि पाय भाजल्या गेले आहे. त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्याला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी यासाठी लाठी येथील ग्रामस्थांनी उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ वणी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, १ मे रोजी लाठी येथील नंदू माहूरे यांनी विद्युत कर्मचारी राजू पावडे यांना मोबाईल फोन करून शेतात जिवंत विद्युत तार पडली आहे. तरी सुध्दा त्या कर्मचाऱ्यांनी त्या कडे दुर्लक्ष केले. त्यामुळे २ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ही घडली. यवतमाळ येथील विद्युत निरिक्षकांनी पंचनामा करून नेला तरी सुद्धा विद्युत कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्यात आली नाही.
तसेच जखमी पियूष माहुरे यांना कुठलीही मदत मीळाली नाही. सध्या त्या मुलावर लातूर येथे उपचार सुरू आहेत. लाखो रुपयांचा खर्च आई वडील करीत आहे. सात दिवसांत त्या मुलाला नुकसान भरपाई आपल्या विभागा कडून देण्यात यावी अन्यथा १ जून रोजी लाठी येथील ग्रामस्थ महाराष्ट्र विद्युत मंडळ वणी च्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातु देण्यात आला. यावेळी राहुल खारकर सदस्य ग्रामपंचायत लाठी, पोलीस पाटील संजीवनी खिरटकर, राजू पिंपळकर, संजय चिंचोळकर, संदीप गोहोकार, धीरज भोयर, मुकेश खिरटकर, नथ्थु बोधे, गणेश माहुरे, निलेश करडे, दीपक मोते, जयंत मत्ते, सुजित बोबडे, भुपेश लाडे, आशिष माहुरे, तोषक गावंडे, यश लांडगे, कुणाल बलकी, ईश्वर माहुरे, प्रमोद खिरटकर, यश धोबे सागर डवरे इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते

