१२ ग्रामपंचायत मधील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
अशोक खंडारे मुख्य संपादक
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड कंपनी सीएसआर तर्फे विघार्थ्यांकरीता उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात परिसरातील बारा ग्रामपंचायत मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता
या शिबिरात व्हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, ॲथलेटिक्स, आर्चरी , वादविवाद स्पर्धा, निबंध लेखन, पर्यावरण जनजागृती, प्रथमोपचार, पेंटींग, स्मरणशक्ती क्रियाकलाप, अग्नी सुरक्षा प्रशिक्षण, विनोदी खेळ,योगा प्राणायाम, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम अश्या क्रियाकलापांचा होता कश्याप्रकारे क्रिडा, मनोरंजन, बौद्धिक विकास, नेतृत्व विकास, पर्यावरण जागरुकता,सुर, स्वयं सुरक्षा व बचाव यांचे प्रशिक्षण देण्यात आले व स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर शिबिरात ७१० विघार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घेतला व क्रिडा स्पर्धेत निपून कामगिरी केली.
बक्षीस वितरण समारंभाला उद्घाटक म्हणून सरपंच श्रीकांत पावडे कोनसरी, प्रमुख अतिथी उपसरपंच रतन आकेवार कोनसरी, सरपंच इंदिरा बोरकुटे उमरी, सरपंच मंगलदास आत्राम मुधोली,सरपंच रतन मंडल बहादुरपूर,ग्रा प सदस्य विजय शिडाम,वैशाली करपेते,सविता आत्राम,सुनिता कोले,व जेष्ठ नागरिक गोमाजी कुळमेथे आणि लॉयड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना १९ स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांना प्रथम , द्वितीय, तृतीय आकर्षक बसिस स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तसेच शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याना मेडल्स व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले अश्याप्रकारे उन्हाळी शिबिराचे समारोपीय कार्यक्रम संपन्न झाले


