पुन्हा घेतला शिक्षकाचा बळी लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकने

0
  पुन्हा घेतला शिक्षकाचा बळी लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकने

 

क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी

आलापल्ली:-
  पाच दिवसांपूर्वी आष्टी येथे एका १२ वर्षीय मुलीला चिरडणाऱ्या सूरजागड लोहखनिज वाहतुकीने आज पुन्हा एका शिक्षकाचा बळी घेतला आहे. वासुदेव कुळमेथे (४९ रा. गोमनी ) असे मृत शिक्षकाचे नाव असून हा अपघात आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर घडला. यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
आज दि.२० मे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रम शाळेत शिक्षक असलेले वासुदेव कुळमेथे हे आपल्या दुचाकीने चंद्रपूर मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून जात होते. दरम्यान, मागून येणाऱ्या एम एच ३४ बि झेड ५५८८ भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आलापल्ली येथील मुख्य चौकात घडल्याने ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून ठेवले होते. सूरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते शहरातूनदेखील भरधाव जात असतात. त्यामुळे या मार्गावर कायम अपघाताचा धोका असतो. काही दिवसांपूर्वी असेच एका अवजड वाहनाने आष्टी येथे १२ वर्षीय मुलीला चिरडले होते. आता निर्दोष शिक्षकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे सूरजागड लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाची कार्यतत्परता चर्चेत
एरवी कोणतीही घटना घडल्यावर उशिराने जागे होणारे प्रशासन सूरजागडच्या वाहनांनी अपघात झाल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात घेतात. एवढेच नव्हे तर अवघ्या काही मिनिटांत परिस्थिती जैसे थे करून वाहतूक सुरळीत करतात. लोकं मेली तरी चालेल पण लोहखनिज वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये. हा नियम ते काटेकोरपणे पाळताना दिसून येतात. अशी चर्चा अपघातस्थळी होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !