बालकांना धम्मसंस्कार देण्यासाठी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण
----------------------------------
बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम :- सम्यक बुद्ध विहारात प्रशिक्षण
-------------------------------
सोपानदेव म्हशाखेत्री उपसंपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली:-
बालकांना त्यांच्या बालवयातच बुद्ध धम्मसंस्काराचे धडे मिळावे. या महत्वपूर्ण हेतूने उन्हाळी सुट्टीत बाल धम्मसंस्कार व प्रौढांसाठी धम्म प्रबोधन शिबिराचे प्रभावी आयोजन करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे वतीने पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
नवेगांव कॉम्लेक्स येथील तथागत ,फुले, शाहू ,डॉ बाबासाहेब आंबेडकर न्यास सम्यक बुद्ध विहारात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षणात बुद्धाचे चरित्र,पहिले धम्मचक्कपवतन, त्रिरत्ने, त्रिशरण, पंचशिल, धम्मपालन गाथा यासह मुलांचे आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर आदि विषयावर संस्कार रुजविण्यासाठी विषयानुसार विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड व जिल्हा संस्कार प्रमुख काका गडकरी यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष इंजि.नरेश मेश्राम यांनी विशेष अतिथी म्हणून स्थान ग्रहण केले. जिल्हा प्रवक्ते धम्मानंद मेश्राम यांनी शिबिराची आवश्यकता व महत्व यावर प्रास्ताविकेतून माहिती दिली.
प्रशिक्षणाचे संयोजन व व्यवस्थापन जिल्हा कोषाध्यक्षा विभाताई उमरे यांनी केले. सुत्र संचलन सुधीर वालदे, राहुल वनकर यांनी तर आभार केमराज सोरते यांनी मानले. प्रशिक्षणाला विभागीय महिला प्रतिनिधी दर्शना शेंडे, जिल्हा पदाधिकारी अँड. सोनाली मेश्राम, भिमराव शेंडे, राधाताई नांदगाये, प्रवृत्ती वाळके,सोपानदेव मशाखेत्री, दुष्यंत तुरे यांचेसह ज्ञानोदय वाळके,विजय घागरगुंडे, विनोद बाबनवाडे, विद्या कांबळे, निलीमा दुधे, रेखा कुंभारे, सारीका बारसागडे, प्रतिमा करमे, आचल जुनघरे,रमेश सहारे, रजनीश नंदेश्वर, किरण ढवळे, किरण चौधरी,संतोष उके, सुजाता पिल्लेवान, हिरकन्या रामटेके, डी.डी. इंदुरकर, पुरूषोत्तम बडोले, हेमा सहारे, जास्वंदा सहारे, विजया धुरके, सारीका बारसागडे, प्रियंका बाबनवाडे, मोनाली लांजेवार, प्रियंका गजभिये, भिमराव खोब्रागडे व तुळशिदास रामटेके आदी सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

