प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
वाशी :-
दि 16 मे 2023 ला 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 15
हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 15 में रोजी एकास रंगेहाथ पकडले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तालुका वाशी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील रक्षण भुमापकास लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरुध्द वाशी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
लाच मागणाऱ्या आरोपीचे नाव सुनील श्रीराम रामदासी (55) परिरक्षण
भुमापक (निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय वाशी, (जि. धाराशिव) असे आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या नावाने असलेल्या जमिनीची अकृषिक अतितातडीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलन देखील भरले होते. तक्रारदार यांच्या जमिनीच्या मोजणीसाठी नोटीस काढून त्यांच्या जमिनीची अतितातडीची मोजणी करून देण्यासाठी सुनील श्रीराम रामदासी यांनी तक्रारदाराकडे सरकारी पंचासमक्ष 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती 15 हजार रूपयाची लाच घेण्याचे ठरले. पंचासमक्ष सुनील रामदासी यांनी तक्रारदाराकडून 15 हजार रूपयाची लाच घेतली. अॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे पोलिस अंमलदार दिनकर उगलमुगले, पोलिस सचिन शेवाळे, पोलिस विष्णू बेळे, पोलिस सिध्देश्वर तावसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे..

