संविधान बदलविण्याची भाषा करणारे लुळे पांगळे झाल्याशिवाय राहणार नाही- बाळासाहेब खोब्रागडे

0
संविधान बदलविण्याची भाषा करणारे लुळे पांगळे झाल्याशिवाय राहणार नाही- बाळासाहेब खोब्रागडे



अशोक खंडारे मुख्य संपादक


गडचिरोली:-
 तथागत बुद्धाने दिलेला धम्म त्याचा प्रसार आणि प्रचार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. डॉ. आंबेडकरानी भारताची घटना लिहून तमाम बहुजनावर उपकार केले, अश्या या महामानवाच्या संविधानाला हात लावून बदलविन्याची भाषा करणाऱ्याचे हात पाय लुळे पांगळे पडून झटका आल्या शिवाय राहणार नाही. यासाठी आपली एकीची ताकद दाखवायची गरज आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे यांनी महादवाडी येथील बुद्ध मुर्तीच्या अनावरण कार्यक्रमा प्रंसगी केले. गडचिरोली तालुक्यातील महादवाडी येथे दि. 17 मे ला तथागत बुद्ध मुर्तीचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी अभारिप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पत्रकार रोहीदास राऊत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत, प्रा. गौतम डांगे, रामनाथ खोबागडे, प चे शेन्डे, हसराज उंदिरवाडे, फकिरा पाटिल रिपाईचे उतम गेडाम, प्रा प्रकाश दुधे, सरपंच खोबागडे, राहुल वनकर, जनार्धन ताकसांडे, प्रा. दिलीप बारसागडे, बाबोळे आदी लाभले होते. रोहिदास राऊत यांनी सांगीतले की जगात बुद्ध धम्माला तोड नाही म्हनुनच सारा जन बुद्ध धम्माचा प्रचार करीत आहेत यातच सर्वाचे कल्याण आहे. याप्रसंगी प्रा. दिलीप बारसागडे, प्रा. मुनिश्वर बोरकर, जनार्धन ताकसांडे, तुलाराम राऊत आदिनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे संचालन रामनाथ खोबागडे, प्रास्ताविक रुषीजी रामटेके तर आभार मुखरु बारसागडे यांनी केले कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !