युवतीचे लैंगिक शोषण करून,युवकाने केले हात वर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन केली अटक

0
 युवतीचे लैंगिक शोषण करून,युवकाने केले हात वर
पोलीसांनी गुन्हा दाखल करुन केली अटक



अशोक खंडारे मुख्य संपादक


माजरी:-

 दि.17.5.23 लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी करून आरोपीने एका 22 वर्षीय युवतीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना माजरी ठाण्यांतर्गत घडली आहे.
गुलाम साबरी सिद्दीकी (22) याची ओळख एका 22 वर्षीय युवतीशी झाली. दोघांची मैत्री झाली. बातचीत करताना त्यांची मैत्री प्रेमात बदलली. त्यांचे नियमित भेटणे सुरु झाले.
 त्यानंतर आरोपी युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी केली. युवतीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर युवकाने दफाई नंबर 1 मथील आपल्या राहते घरी बोलावून तिला शरीरसुखाची मागणी केली. युवक लग्न करणार असल्यामुळे तिनेही त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला
आरोपी युवकाने 5 जानेवारी 2020 ते 10 मे 2023 दरम्यान वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर युवतीने लग्नासाठी हट्ट धरला असता आरोपी युवकाने परिवाराच्या जवाबदाऱ्या सांगून लग्न करण्यास टाळले व सरळ हात वर केले. आरोपी खोटे आश्वासन देऊन वारंवार आपल्या सोबत लैंगिक संबंध प्रस्तापित केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवतीने विष प्राशन केले. दरम्यान फिर्यादीचे बहीणीने तिला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले. दरम्यान फिर्यादीची प्रकृती बरी झाल्यानंतर तिने माजरी पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दिली. दरम्यान मंगळवारी दुपारी माजरी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध अप. क्र.54/23 कलम 376, 376 (2) (एन) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे, पोहवा. गजानन जुमडे, हरिदास चोपणे करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !