बदनामीची धमकी देत विवाहित महिलेशी केले शारिरक संबंध प्रस्थापित

0
बदनामीची धमकी देत विवाहित महिलेशी केले शारिरक  संबंध प्रस्थापित 


प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक 

चंद्रपूर (Chandrapur) : विवाहित महिलेला बदनामीची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोरपना तालुक्यात घडली आहे. कोरपना तालुक्यातील तेलंगाना सीमेजवळील एका गावातील विवाहित महिलेवर नवऱ्याच्या नाते संबंधातील चुलत मामे भावाकडून तिच्याशी जबरदस्ती करत बदनामीची धमकी देत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार कोरपना पोलीसात बुधवारी दाखल करण्यात आली आहे.
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घराशेजारी राहणाऱ्या नवऱ्याचा चुलत मामे भाऊ याने पिडीतेला एक महिन्यापासून छेडछाडी करून तिला तिचे बदनामी ची धमकी देत होता. 20 एप्रिलला पिडीत विवाहित महिला घरात एकटी असताना त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा दोनदा धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 10 मे ला हात धरून बकऱ्या चरायला चाल म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याला कंटाळून पीडित महिलेने पतीसह कोरपना पोलीस स्टेशन गाठून बुधवारी तक्रार दाखल केली.
याप्रकरणी आरोपी शुभम वय 22 वर्ष याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 376 (2) (एन), 354,417, 506 भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !