विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेनी पुढे यावे -आ.धर्मरावबाबा आत्राम

0
 विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेनी पुढे यावे -आ.धर्मरावबाबा आत्राम 


लगाम येथील महा राजस्व अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोमेश मडावी तालुका प्रतिनिधी मुलचेरा 

मुलचेरा :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आजही या तालुक्यात कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासनाला पुढाकार घ्यावा लागत आहे.महाराजस्व अभियानातून शासन आपल्या दारी आले असून आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेने पुढे येण्याची गरज असल्याचे मत अहेरी विधान सभाचे आमदार धर्मराव बाबा आञाम  यांनी मांडले. मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे तहसील कार्यालय मार्फत आज दिनांक 11 मे  रोजी  मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजस्व अभियान कार्यक्रमच्या उदघाटन प्रसंगी  बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम  होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी तहसिलदार सर्वेश मेश्राम , लगाम येथील सरपंच दिपक मडावी , उपसरपंच मधूकर गेडाम लगाम,  नायब तहसिलदार करिष्मा चौधरी, गटविकास अधिकारी एल बी जुवारे, कृषी अधिकारी (पंचायत) युवराज लाकडे,ग्रा प सदस्य राजु पंबलवार ,ग्रा.प.सदस्य अमित मुजुमदार, ग्रा.प.सदस्य उमा आञाम, पुजा गोविंदवार, शैला मडावी,तमुस अध्यक्ष क्रिष्णा गावडे  लगाम,  ग्रामसेवक राकेश दुर्गे  लगाम  उपस्थित होते.


पुढे बोलताना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आपल्या आदिवासी बांधवासाठी राबविण्यात येतात, मात्र अजूनही बरेच योजनांची माहिती आपल्याला नाही.या माध्यमातून कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घेऊन त्या योजनांचा लाभ घेतल्यास भविष्यात नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे.या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतःचे कागदपत्र अपडेट असणं गरजेचं आहे.त्यासाठी सुशिक्षित युवा वर्गाने पुढाकार घ्यावा,असे आवाहनही आमदार धर्मरावबाबा  आत्राम यांनी केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रभारी तहसिलदार सर्वेश मेश्राम प्रस्ताविकेतून त्यांनी विविध योजनांची माहिती देतानाच गेल्या 15 दिवसांपासुन नागरिकांसाठी तयार केलेले विविध दाखले व प्रमाणपत्राची माहिती दिली.या अभियानात विविध विभागाचे स्टॉल लावून माहिती देण्यात आली.तर अभियानात  लगाम , येल्ला,मरपल्ली,कोठारी
कोलपल्ली, गिताली ,काचंनपुर ,
शांतीग्राम ,नागुलवाही,मच्छीगटा, येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते गरजू आणि लाभार्थ्यांना विविध दाखले,प्रमाणपत्र आणि गोपिनाथ मुडे अपघात विमा योजनेचे लाभार्थ्यांना धनादेशाचे चेक  देण्यात आले    शालेय विद्यार्थ्यांना   स्काँलरशिप व साईकल वाटप करण्यात आल्या तसेच कृषी विभागा मार्फत एक ट्रॅक्टर व मळनी यंत्र सुध्दा वाटप करण्यात आले
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबतच आरोग्य  विभाग, वन विभाग, कृषी विभाग, इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. व कार्यक्रमाचे आभार  तलाठी रितेश चिंदमवार  यांनी  माणले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !