भाचीच्या लग्नात नाचता - नाचता मामाचा मृत्यू

0
भाचीच्या लग्नात नाचता - नाचता मामाचा मृत्यू


अशोक खंडारे मुख्य संपादक 

भिलाई:-
सध्या लग्नाचे सीजन सुरु अजून लग्नाचे अनेक Video: व्हायरल होतात, काही हसवणारे असतात तर काही रडवणारे असतात. असाच एक video डान्स करताना मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विदेओ भिलाई स्टील प्लांटचे दल्ली राजहरा खाण येथील असल्याचे समोर आले आहे.
घटना ४ मेची आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिलीप राऊतकर लग्न समारंभाच्या मंचावर वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह आनंदाने नाचत आहेत. एक मिनिट 19 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, एक मिनिटानंतर दिलीप स्टेजवर बसतो, पुढच्या काही सेकंदात खाली पडतो.
दरम्यान, काय झाले हे लोकांना समजण्यापूर्वीच दिलीपला जीव
गमवावा लागला. नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 मे रोजी
दल्ली राजहरामध्येच त्यांच्या भाचीचे लग्न होते. रात्री 12 वाजण्याच्या
सुमारास दिलीप आणि त्याचे नातेवाईक मंचावर वधू-वरांसोबत जोरदार नाचत होते. नाचत असताना 52 वर्षीय दिलीप यांना अचानक छातीत
दुखू लागले आणि ते स्टेजवर लोळले. त्यांना दवाखान्यात नेण्याची
संधीही त्याला मिळाली नाही. त्याचा जागीच मृत्यू झाला.
लग्नसमारंभात लोकांची त्याच्यावर नजर पडली तेव्हा त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्याचा श्वास थांबला होता. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. गेल्या काही काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !