आलापल्लीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
आ.धर्मराव बाबा आत्राम यांची शोभा यात्रेत उपस्थिती
क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी:- पवनसुत, बजरंगबली, हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आलापल्ली येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून सायंकाळच्या सुमारास शहरात डीजेच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम सहभागी झाले.
आलापल्ली,नागेपल्ली शहरात विविध ठिकाणी अनुमान मंदिरात भाविकांनी पवनसुत हनुमानाची पूजा अर्चना करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. शहरातील विविध मंदिरात हनुमानाची पूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. नागेपल्ली येथे महाप्रसाद तर आलापल्ली येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळच्या वेळेस महाप्रसाद वितरण झाल्यावर विविध ठिकाणी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नागेपल्ली येथील हनुमान मंदिराला भेट देऊन पूजा अर्चना करत भाविकांना महाप्रसाद वितरण केले.लगेच शोभायात्रेसाठी सज्ज असलेल्या वाहनसमोर नारळ फोडून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलापल्लीत विविध ठिकाणी पूजा अर्चना करून येथील शोभायात्रेत सहभागी झाले. हनुमान जन्मोत्सव सोहळ्यामुळे परिसरात धार्मिक वातावरण दिसून आले.
युवकांच्या आग्रहास्तव डिजेच्या तालावर आमदारांनी धरला ठेका
भामरागड रस्त्यावरील बजरंग चौकातुन निघालेल्या शोभायात्रेत आ.धर्मराव बाबा आत्राम सहभागी होताच युवकांनी नाचण्यासाठी आग्रह केला.आमदारांनी सुद्धा त्यांना नाराज न करता युवा वर्गाचा उत्साह वाढविण्यासाठी डीजेच्या तालावर ठेका धरला.

