मार्कंडा(कं) गावालगत पोलीसांनी पकडली अवैध दारू वाहतूक करणारी कार
६,९६,६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी पोलीसांनी गोपनीय माहिती च्या आधारे चंद्रपूर कडून आलापल्ली कडे चोरट्य मार्गाने दारु तस्करी होत आहे अशी पक्की खबर मिळाली त्यावरुन आष्टी पोलीसांनी एका खासगी वाहनाने मार्कडा (कं) गावाजवळ सापळा लावला तेव्हा एम एच ०२ बी पी ३९८३ या क्रमांकाची कार हिला रोखून तपासणी केली असता कार मध्ये अवैध दारु आढळून आली.
सदर कारमध्ये बिअर टिन ५४ हजार रु, आर एस विदेशी दारू ४५ हजार रु , देशी दारू ४० हजार रुपये,आयबी विदेशी दारू ४३ हजार दोनशे रुपये, रायल स्टांग १४४०० रुपये,व कार किंमत पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख छान्नव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कार चालक कोमल रतन निमगडे रा.आंबेडकर नगर बायपास रोड बाबुपेठ चंद्रपूर असे आहे या विरोधात ६५(अ)मुदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे,पो.उपनिरीक्षक अजय राठोड, पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले,नापोशी ज्ञानेश्वर म्हस्के ,पो शी तोडासे,रायशिडाम,तिमाडे,मेश्राम यांच्या पथकाने केली.