सचिन पवार लायन्स क्लब गडचिरोलीचे उपाध्यक्ष यांची धनुर्विद्या प्रशिक्षण केन्द्राला भेट

0
सचिन पवार लायन्स क्लब गडचिरोलीचे उपाध्यक्ष यांची धनुर्विद्या प्रशिक्षण केन्द्राला भेट 

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता

आष्टी (वैनगंगा वार्ता) आष्टी येथील भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार खेलो इंडिया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राला माननीय श्री. सतीश पवार साहेब गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल संघटना सचिव तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना ,लायन्स क्लब गडचिरोली जिल्हा चे उपाध्यक्ष यांनी भेट दिली. तसेच खेळाडूंना थोडक्यात मार्गदर्शन केले व आर्थिक मदत देखील करू असे सांगितले. यावेळी मा. ज्योतिबा फुले महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, प्राचार्य शैलेन्द्र खराती, धनुर्विद्या प्रशिक्षक प्रा. श्याम कोरडे, श्री .ताहीर शेख पोलिस विभाग गडचिरोली, मा. अमितभाऊ शेंडे सर विद्युत विभाग आष्टी, मा. शाबीर शेख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुशील अवसरमोल यांनी केले. तर आभार अरविंद वनकर याने मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !