खेळण्याच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; धारदार लोखंडी सुरी पोटात खुपसली

0
खेळण्याच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; धारदार लोखंडी सुरी पोटात खुपसली

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता न्यूज 

राजुरा ( वैनगंगा वार्ता न्यूज ) राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथे गावातील काही युवक आपसात खेळत असताना येथे आलेल्या एका युवाकाने खेळण्यासाठी इच्छा व्यक्त केली. मात्र त्याला खेळू ना दिल्याने शुल्लक कारणावरून झालेल्या वादात धारदार शस्त्राने युवकाची हत्या झाली. राजुरा तालुक्यातील बामणवाडा या गावात घडली.

आज सकाळी 9 वाजता दरम्यान महादेव कोडापे ( 22 ) वर्ष रा. बामणवाडा हा गावातील काही लोकांसोबत गावात खेळत होता. तिथे आलेल्या शक्ती टेकाम ( 22 ) वर्ष रा. बामणवाडा पाला खेळू न दिल्याने शक्ती ने खेळत असलेल्या जागेवर पाणी टाकले. यामुळे महादेव कोडापे व शक्ती टेकाम यांच्या भांडण झाले. या भांडणाचा राग मनात ठेवून शक्ती टेकाम याने स्वतःचा घरातून धारदार लोखंडी सूरी काढत महादेव कोडापे यांच्या पोटात खूपसली.

हे पाहताच घटनास्थळी एकच कल्लोळ उडाला. उपस्थित लोकांनी शक्तीला आवरले आणि महादेवाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे नेण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित केले, मात्र चंद्रपूर येथे पोहोचता ही डॉक्टरनि महादेव कोडापेला मृत घोषित केले. मृत महादेव कोडापे हा बामणवाडा येथे मागील अनेक वर्षापासून वास्तव्याने राहत असून तो मजुरी करून आपल्या परिवारचा उदरनिर्वाह करीत होता. महादेव आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

क्षुल्लक कारणावरून झालेल्या या घटनेची काही वेळात गावत तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची ताफा गावात पोहचला. पोलिसांनी शक्ती टेकाम याला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांचा विरुद्ध भादंवि 302, शस्त्र अधिनियम कलम 25, 4, 135, 37 अन्वये गुन्हा दाखल केला असून सामोरील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !