आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे लोकार्पण

0
आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे लोकार्पण


क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी
 भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल लाहेरी परिसरातील विविध गावात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, अहेरी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,लाहेरीचे सरपंच राजेश्वरी बोगामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुकाध्यक्ष रमेश मारगोनी, उपसरपंच प्रकाश पुंगाटी, सदस्य गोंगलू गोटा, राकेश आतलामी, सपना कुळयामी, रुक्मी गोटा, विमल गुम्मा, लक्ष्मीकांत बोगामी,शामराव येरकलवार, ज्ञानेश्वर भांडेकर,मारोती दुर्वा,देवु वेलादी आदी उपस्थित होते.

भामरागड तालुक्यातील लाहेरी, मलमपोडूर,मुरंगल,लष्कर आदी गावांत विकास कामांसाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठी निधी दिली होती.त्या निधीतून सिमेंट काँक्रेट रस्ते,नाली बांधकाम तसेच इतर विकास कामे पूर्ण करण्यात आली.आज आमदार धर्मराव बाबा आत्राम भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांच्या हस्ते या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात आमदार आत्राम यांनी भेटी देऊन नागरिकांशी आस्थेने संवाद साधताना लाहेरी परिसरातील नागरिकांनी आरोग्यसह इतर समस्यावर लक्ष वेधले तसेच निवेदने दिली. यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !