अ. भा. रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी मंगळवेढा येथे जोडेमारो आंदोलन

0


अ. भा. रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी मंगळवेढा येथे जोडेमारो आंदोलन


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

मंगळवेढा-:दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले, प.पु.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे तालुका अध्यक्ष समाधान भोसले यांनी दिली .
          यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव डी.के.साखरे, जिल्हा अध्यक्ष समाधान कांबळे, महिला आघाडीच्या नेत्या पद्मिनी शेवडे, वैशाली चंदनशिवे, भटक्या सेल चे जिल्हा अध्यक्ष भाई रवींद्र काळे, जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथ सरवदे, जिल्हा सरचिटणीस श्रीमंत आठवले ,पंढरपूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण (तात्या) वाघमारे, माळशिरस तालुका अध्यक्ष रामदास धाइंजे, मोहोळ तालुका अध्यक्ष उत्तम कांबळे, जिल्हा महिला उपाध्यक्ष गवळण लोखंडे, प्रभाताई गायकवाड,पंढरपूर तालुका महिला अध्यक्ष बाळाताई डावरे, मंगल कांबळे,नाजूका लोखंडे आदी उपस्थित राहणार असल्याची माहितीही भोसले यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !