प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता न्यूज
आष्टी वैनगंगा वार्ता न्यूज
आष्टी येथील भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार खेलो इंडिया अंतर्गत महात्मा.. ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राला माननीय श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन अहेरी. (प्राणहिता)यांनी भेट दिली. व ग्रामीण भागातील खेळाडूंना धनुर्विद्या खेळातून राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव लौकिक करता येईल .आणि भविष्यात धनुर्विद्या खेळातूनच एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या परीक्षांमध्ये खेळाडू कोट्यातून यश संपादन करता येईल अशा प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी प्राचार्य. डॉ. एम. एस.बुटे भगवंतराव महाविद्यालयं एटापल्ली,डॉ. अर्पणा मारगोनवार, प्राचार्य डॉ. संजय फुलझेले मा. ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी , प्राचार्य शैलेन्द्र खराती मा. ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी, धनुर्विद्या प्रशिक्षक प्रा. श्याम कोरडे, प्रा. डॉ. राज मुसणे, प्रा. ज्योती बोभाटे तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. पूजा डोर्लीकर तर आभार कौमुदी श्रीरामवार हिने मानले.

